इंद्रराज महाविद्यालयात डिजिटल टूल्सवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अजंठा एज्युकेशन अँड मिलिटरी प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संचलित इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड - येथे ग्रंथालय विभाग आणि संगणकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. ९) रोजी या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे - उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब., प्रमुख पाहुणे - डॉ. राजेश एस. सरकटे, डॉ. सी. एम. - काळे आणि डॉ. जे. एस. अंभोरे उपस्थित - होते. डॉ. राजेश एस. सरकटे यांनी आणि वर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या - तांत्रिक सत्रात सहाय्यक प्राध्यापक एन. - जे. मिसाळ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांचा अध्यापनातील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. 

तसेच अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब. यांनी दैनंदिन कामकाजात व डिजिटल टूल्सचा वापर, माहिती व्यवस्थापन आणि ग्रंथालयीन सेवा अधिक कार्यक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि ग्रंथालयीन सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करणे हा होता. समारोप सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी. एम. काळे, अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब आणि उपस्थितांमध्ये कार्यालय अधीक्षक श्री. किरण ए. राजपूत यांचा सहभाग होता. कार्यशाळेकरीता संस्थेचे सचिव श्री. अशोक देवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. राजपूत शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल तथा संयोजक डॉ. एस. एम. म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. 

संगणकशास्त्र विभागाचे संयोजक सहाय्यक प्राध्यापक यू. आर. कलात्रे यांनी सूत्रसंचालन केले आणि सहसंयोजक सहाय्यक प्राध्यापक बी. एन. थोरात, यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी ग्रंथालयीन कर्मचारी वाय. आर. डापके, ज्योती तोमर, कृष्णा कुमावत यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेकरिता प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.